पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून भूषण पवार यांची जाहीर माघार

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लागली असून उद्या दि 28 रोजी मतदान आहे. याच्या पूर्वसंध्येला भडगाव येथील भूषण अविनाश पवार यांनी जाहीर माघार घेतली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून भूषण पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु महा विकास आघाडीच्या पॅनल मध्ये त्यांना उमेदवारी न मिळाल्याने मी माघारी अर्ज दिला होता. परंतु त्यात थोडा उशीर झाल्याने माझे नाव मतपत्रिकेत आलेले आहे. तरी सर्व मतदारांना सूचित करतो की मी जाहीर माघार घेत आहे असे भूषण पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.