पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका सुरूच! इंधनाचे दर पुन्हा ८० पैशांनी महागले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:पेट्रोलियम कंपन्यांनी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इंधन दरात वाढ केली होती. गेल्या सलग दिवसांपासून इंधनदरात (Petrol Diesel Price Today) वाढ होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, गेल्या तेरा दिवसातील ही अकरावी दरवाढ आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इंधन दरात वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्चपासून इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या १३ दिवसांत पेट्रोल ८ रुपयांनी महाग झाले आहे.

या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११८.४१ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.४१ रुपये झाला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११३.०३ रुपये इतका वाढला असून, चेन्नईत पेट्रोलचा भाव १०८.९६ रुपये इतका झाला आहे. मुंबईत डिझेल दरांनी शंभरी ओलांडली आहे. एक लीटर डिझेलचा १०२.६४ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत डिझेल ९४.६७ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९९.०४ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९७.८२ रुपये झाला आहे.

इंधनदरवाढीवरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलची होत असलेली दरवाढ पाहता, पुढील निवडणुकीपर्यंत इंधनाचे दर लीटरमागे २७५ रुपयांवर पोहोचतील, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १३७ दिवस स्थिर ठेवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.