अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखविल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापुर:- शहरातील कुलमखेड परीसरातील एका बावन्न वर्षीय इसमाने त्याच्या किराणा दुकानासमोरुन जाणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून तिला मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ दाखविले.

याबाबत तिने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्या मुलीने घरी जाऊन सदरची बाब आईला सांगितली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईलाही उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या घटनेची तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पो.स्टेला दिली तक्रारीत नमूद केले आहे.

की सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी काल रात्री साडेआठ वाजेदरम्यान घराकडे येत असताना संजय माधव जवळकार वय 52 रा.कुलमखेड याने त्याच्या किराणा दुकानात तिला बोलावून त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्या लज्जेस धोका पोहचेल असे कृत्य केले असल्याची फिर्याद दिल्यावरून शहर पोलिसांनी संजय माधव जवळकार याचे विरुद्ध कलम 354,सह कलम बाल लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला

असून काल रात्रीच संजय जवळकार यास पोलिसांनी अटक केली असून आज त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे, रायटर प्रवीण काकडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.