लग्नाला विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पाचोरा ;- प्रेमीयुगलाने घरून लग्नाला विरोध झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री पहाटे २ वाजेच्या सुमारास पडक्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील वरखेडी परिसरामध्ये रा उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जितेंद्र राजू राठोड (वय १९) आणि साक्षी सोमनाथ भोई (वय १८, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) असे मयत प्रेमीयुगुलांची नाव आहे. यातील तरुणी साक्षी भोई हिचा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २३ जून रोजी विवाह संपन्न झाला आहे. विवाह नंतर ती रविवारी माहेरी आली होती. दोघेही वरखेडी नाका जवळच राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोघेही तरुण-तरुणी मध्ये संपर्क झाला. त्यानुसार त्यांनी रात्री घराच्या मागे असलेल्या मोंढाळा रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेच्या ठिकाणी भेटून त्यांनी स्वतःला एकाच दोरीने गळफास लावून जीवन संपवले. दरम्यान मध्यरात्री, जेव्हा मुलीच्या भावाला जाग आली तेव्हा त्याने बहिणीला शोधले. मात्र ती मिळाली नाही. घराच्या मागील बाजूस अंगणवाडीच्या ठिकाणी काहीतरी असावे म्हणून त्या ठिकाणी पाहण्यास गेले तर त्या ठिकाणी दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर कुटुंबीय व नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय,पाचोरा येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परिवार आहे तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.