राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा इशारा

0

मुंबई ;- बऱ्याच ठिकाणी, सध्या उष्णतेची लाट आहे, तर काही भागात पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार, १६ ते १९ मार्च दरम्यान काही ठिकाणी ढग दाटून येण्याची शक्यता आहे. ही स्थिती मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह भागात राहण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढग कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 16 ते 19 मार्चपर्यंत विदर्भात ढग आणि पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. सकाळ थंड असते, दुपार कडक असते, त्यानंतर संध्याकाळ थंड असते. अशा परिस्थितीत राज्यात पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे. त्यामुळे आजपासून पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाड्याच्या काही भागावर ढग दाटून येतील. याशिवाय विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे या भागात अनपेक्षित पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.