फोन सिम कार्डसाठी नवीन नियम जारी

0

नवी दिल्ली ;- फोन सिम कार्डसाठी नवीन नियम जारी करण्यात आला आहे. हा नियम भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) 15 मार्च रोजी जारी केला होता. जी 1 जुलैपासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नवीन नियमानुसार, जर मोबाईल वापरकर्त्यांनी अलीकडेच त्यांचे सिम कार्ड स्वॅप केले असेल तर ते त्यांचा नंबर पोर्ट करू शकणार नाहीत. सिमची देवाणघेवाण करण्याच्या पद्धतीला स्वॅपिंग म्हणतात. आणि जेव्हा सिम कार्ड हरवले किंवा तुटलेले असते तेव्हा हे केले जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचे जुने सिम एक्सचेंज करून तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरकडून नवीन सिम मिळवता.

फसवणुकीच्या घटना पाहता असे पाऊल उचलले जात आहे. सिम स्वॅपिंग किंवा बदलल्यानंतर लगेचच मोबाईल कनेक्शन पोर्ट करण्यापासून फसवणूक करणाऱ्यांना रोखणे हा या नवीन नियमाचा उद्देश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.