उन्हाळा स्पेशल: द्राक्षाचे थंडगार सरबत

0

खाद्यसंस्कृती विशेष

उन्हाळ्याच्या दिवसांत द्राक्षे मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. द्राक्षे हे असेच एक फळ आहे जे लहान मुले आणि प्रौढ दोघांनाही आवडते. यामुळे शरीरातील उष्णा कमी होतो.आपण द्राक्षं तर नेहमीच खात असतो. पण आज आपण द्राक्षांचे थंडगार सरबत कसे बनवायचे ते पाहूया..

साहित्य:

• साधारण २ किलो द्राक्षे

• १ लि.रसाला

• १ लि.पाणी

• २ कि. साखर

• अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड

• १ चमचा सोडियम बेन्झॉइट

• १ चमचा टोनोग्रीन इसेंस (रंग व इसेंस एकत्र असतो.)

 

कृती:

• प्रथम द्राक्षे धुऊन घ्यावीत. (काळी, हिरवी) व ५ मिनिटे पाण्यात शिजवून व पुरण यंत्रातून काढावीत. निघालेला रस १ लिटर असेल तर १ लिटर पाणी घ्यावे.

• १  लि. पाणी साखरेत एकत्र करून अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे.

• एक उकळी येईपर्यंत ढवळावे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. गार झाल्यावर त्यात द्राक्षाचा रस ओतून त्यात १ चमचा सोडियम बेन्झॉइट घालावे.

• पाव भाग सिरप, पाऊण भाग पाणी, बर्फाचा खडा, चवीला हवे असल्यास मीठ टाकावे.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई

मो. ९८९२१३८१३२

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.