75 शेफनी मिळून बनवला इतका मोठा डोसा, ज्याची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये…

0

 

बेंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारतीयांना डोसा इतका आवडतो की तो प्रत्येक घरातील मुख्य अन्न बनला आहे. खरं तर, साऊथ इंडियन डिश डोसाचे जगभरात चाहते आहेत, जे लोकांना खूप आवडीने खायला आवडतात. डोशाचे अनेक प्रकार पाहिले तर लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, आता डोसाप्रेमींनी नवा बेंचमार्क सेट केला आहे. अलीकडेच एका गटाने १२३ फूट लांबीचा सर्वात लांब डोसा बनवून विश्वविक्रम मोडला.

जगातील सर्वात लांब डोसा

खरं तर, MTR Foods आणि Lorman Kitchen Equipments ने 100 व्या वर्धापनदिनानिमित्त 123 फूट लांबीचा डोसा बनवला आहे, ज्याने आतापर्यंत बनवलेल्या सर्वात मोठ्या डोसाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब पटकावला आहे. बेंगळुरू येथील एमटीआर फॅक्टरीमध्ये १५ मार्च रोजी ७५ शेफनी मिळून ही कामगिरी केली. हे करणे अजिबात सोपे नव्हते. डोसा बनवताना ते तब्बल 110 वेळा अयशस्वी झाले परंतु असे असूनही, आपल्या मेहनतीने त्यांनी आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले.

हा व्हिडिओ रेगी मॅथ्यू नावाच्या एका मोठ्या शेफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रेगी मॅथ्यू जगातील सर्वात मोठ्या डोसासोबत उभे असल्याचे दिसत आहे. असे सांगण्यात येत आहे की, केवळ शेफच नाही तर हॉटेल व्यवस्थापनाशी संबंधित एमएस रमैया कॉलेजचे लोकही या कामात सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.