पत्रकाराला पोलीसाने दिलेल्या धमकीचा पत्रकारांच्या वतीने निषेध… अप्पर अधिक्षक गवळी यांना निवेदन

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सुरू असतांना, वृत्तांकनासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षकांनी परवानगी दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने खरोखरच साहेबांनीच परवानगी दिली आहे का? जर दिली नसेल तर तुम्हाला महाग पडेल! अशी धमकी दिल्याने यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने याबाबतचे निवेदन. जळगाव येथे आज देण्यात आले. तसेच अश्या आयशाचे निवेदन जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले.

यावेळी पत्रकार संघ शहराध्यक्ष सुरेश पाटील, अय्युब पटेल, डी.बी.पाटील, शेखर पटेल, प्रकाश चौधरी, सुनिल गावडे, मनोज नेवे, तेजस यावलकर, पराग सराफ, विकी वानखडे, दीपक नेवे, गोकुळ कोळी, समाधान पाटील यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.