“नो सर” ला आता कायमचा नो…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या मागणीनंतर राज्यसभा सचिवालयाने “नो सर” शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या मागणीला राज्यसभा सचिवालयाने मान्य केले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या कामकाजादरम्यान कानावर पडणारा ‘नो सर’ हा शब्द येथून पुढे ऐकू येणार नाहीये.

प्रियंका यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्राला देण्यात आलेल्या उत्तरात हा निर्णय घेण्यात आला आहे. ८ सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात पुरुषप्रधान असलेला हा शब्द बदलावा अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली होती. प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात चतुर्वेदी यांनी ‘नो सर’ सारख्या वाक्यांचा वापर बदलण्याची मागणी केली होती. जो अनेकदा सभागृहात उत्तरावेळी बोलला जात होता.

प्रियांका चतुर्वेदी यांच्या पत्रावर राज्यसभा सचिवालयाने उत्तर दिले आहे की, राज्यसभेतील अधिवेशन आणि कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांनुसार, सभागृहाचे सर्व कामकाज सभापतींना संबोधित केले जाते आणि संसदीय प्रश्नांची उत्तरे देखील कार्यवाहीचा एक भाग आहेत. मात्र, राज्यसभेच्या पुढील अधिवेशनापासून संसदीय प्रश्नांची उत्तरं जेंडर न्यूट्रल देण्याचे मंत्रालयांना सूचित केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

https://twitter.com/priyankac19/status/1572505318831296515?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1572505318831296515%7Ctwgr%5E9b212e0825f66aa85af8bb403a65908871c76fe2%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fsakal-epaper-esakal%2Frajyasabhaaatarajyasabhetnosirmhanayachnahisenakhasadarachyamaganilayash-newsid-n425055400%3Fs%3Dauu%3D0x2d0c54a64bc38803ss%3Dpd

दरम्यान, राज्यसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘छोटं पाऊल, मोठा फरक. मंत्र्यांपासून महिला खासदारांपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे देताना, संसदेतील पुरुषप्रधान शब्द दूर केल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाचे आभार त्यांनी मानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.