‘पठ्ठे बाबुराव’च्या माध्यमातून पठ्ठे बापूराव यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या बायोपिकची क्रेझ नघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून शाहीर साबळे यांची जीवनगाथा आपल्यलाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. अशातच एका बायोपिकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

शाहीर परंपरेतलं सर्वात लोकप्रिय नाव लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर लवकरच एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून आता ‘पठ्ठे बाबुराव’ या चित्रपटाचंही तो दिग्दर्शन करणार आहे. शाहिरी परंपरेमध्ये अजरामर असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट ‘पठ्ठे बाबुराव’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आणणार आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर दिसणार आहेत. प्रसाद ओक ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ यांचे पात्र तर अमृता खानविलकर ‘पवळा’ ही भूमिका साकारणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.