पारोळ्यात आरक्षणासाठीचे साखळी उपोषण मागे

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पारोळा येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले आमरण उपोषण शासनाच्या विनंती वरून २ जानेवारी २०२४ पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या समर्थनार्थ पारोळा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ शिवाजी महाराज पुतळ्या जवळ पी.जी पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेले साखळी उपोषण दि ३ रोजी शुक्रवारी सकाळी १० वाजता माजी पालकमंत्री डॉ सतिष पाटील, पारोळा पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या हस्ते पी.जी पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील, दौलतराव पाटील यांना लिंबू पाणी देऊन सोडण्यात आले. यावेळी एक… मराठा… लाख… मराठा या सह विविध घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, माजी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, रविंद्र पाटील, डॉ शांताराम पाटील, पतंगराव पाटील आदींसह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.