पारोळ्याच्या व्यापाऱ्याची स्कुटी बुकींगच्या नादात ऑनलाईन फसवणूक

0

पारोळा :- सोशल मीडिया वेबसाईटवर आवडलेली दुचाकी घेण्याच्या नादात व्यापाऱ्याला ७७ हजारात ऑनलाईन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कजगाव रोडवरील असलेल्या श्रीराम इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक भगतसिंग अजबसिंग गिरासे यांनी दि. २१ ऑक्टोंबर रोजी सोशल मीडियावर एक वाहन आवडले. त्यांनी ते वाहन बुकींगसाठी ऑनलाईन फॉर्म भरुन चलन देखील भरले होते. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या ऑफीसमध्ये फोन करुन विचापूस केली त्यावेळी त्यांना संबंधित वाहन उशिराने लाँच होणार असून त्यानंतर तुम्हाला ते वाहन देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना पुन्हा एका क्रमांकावरुन फोन आला. त्यांनी आठ दिवसात वाहन देण्यात येणार असल्याचे सांगत गिरासे यांच्याकडून वेळोवेळी ७६ हजार ३०० रुपये उकळले. परंतु त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर गिरासे यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ऑनलाईन ठगाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.