सोन्या चांदीचे दागिने पॉलिश करून देण्याच्या नावाखाली सव्वा लाखाला महिलांना घातला गंडा

0

चाळीसगाव ;- सोन्या चांदीचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका तरुण महिलेने दोन महिलांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 3 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील टाकळी प्रचार येथील तुळसाई नगर येथे घडली या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की टाकळी प्रचा येथील रहिवासी असलेल्या रेखा संतोष पाटील वय 42 यांनी फिर्यादीत म्हटले आहे की तीन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास 30 ते 32 वयोगटातील एक अनोळखी महिला तुळसाई नगर येथे आली असता रेखा पाटील यांच्या घराशेजारी राहणाऱ्या मंगलाबाई राजेंद्र चित्ते व मीराबाई अमृत महाजन यांना तुमचे सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करून परत दुपारी बारा वाजता आणून देते असे सांगून एक लाख 17 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन अनोळखी महिला फरार झाली. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरून रेखा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.