एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. हडपसर भागातील औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत ही घटना घडली आहे. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीये.

मोतीलाल साहू असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हडपसर येथील पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी धीरजसिंग गोपालसिंग गौड याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकरदीन आणि आरोपी धीराजसिंग हडपसर औद्योगिक वसाहतीत पुन्हा फ्लोअर अँड फूड्स कंपनीत काम करतात. कंपनीतील तिसऱ्या मजल्यावर सोमवारी सकाळी धीरजसिंग काम करीत होता. त्यावेळी चेष्टा मस्करीतून धीरजसिंगने यंत्रांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर कॉम्प्रेसरने मोतीलालच्या गुदद्वारात हवा भरली. हवा पोटात शिरल्यामुळे शारीरिक इजा होऊन मोतीलालचा जागीच मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.