पारोळा : घराचा कडीकोयंडा उघडून स्वयंपाक घरात ठेवलेल्या बॅगेतून ९९ हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना तालुक्यातील शेळावे बुद्रुक येथे घडली.
शेळावे येथील किरण प्रल्हाद बिऱ्हाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली की, १७ नोव्हेंबरला त्यांच्या पुणे येथील साडूची मुलगी योगिला नेतकर हि नातवंडासह घरी दिवाळीनिमित्त आली होती. स्थानंतर मुलगी योगितास अमळनेर येथे नातेवाईकांकडे जायचे असल्याने तिने तिचे सोन्याचे दागिने हे तिच्या बॅगेत ठेवून ती बॅग त्यांची पत्न ी मंगलबाई यांच्याकडे ठेवायला दिली. ती बॅग मंगलाबाईंनी स्वयंपाक घरातील भिंतीजवळ ठेवली. दरम्यान, १८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजेच्या सुमारास किरण बिऱ्हाडे तसेच मंगलबाई व मुलगी योगिता हे अमळनेरला गेले होते.
तर मलगा रुपेश हा शेतात गेलेला असल्याने त्यांनी घरास कुलुप न लावता कडीकोयंडा लावला. तर सायंकाळी ४ वाजता अमळनेर येथून ते शेळावे येथे परत आले- त्यावेळीर रूपेश हा शेतात होता. तर घराचा दरवाजा उघड़ा होता. घरात गेल्यानंतर स्वयंपाक घरातील बॅगा हि उघडी दिसली. योगिताने बॅगा तपासली असता सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. यात ३० हजारांची १० ग्रॅमची सोन्याची चैन, २४ हजारांची ८ ग्रॅमची सोन्याची चैन, १५ हजारांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे टोंगल, ९ हजारांचे ३ ग्रॅमचे सोन्याचे कर्णफुले, ९ हजाराचे ३ ग्रॅमचे कानातील सोन्याचे बेल, ६ हजाराचे २ ग्रॅमचे सोन्याच्या रिंगा, ६ हजाराचे २ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल असा एकूण ९९ हजाराचा सोन्याचे दागिने हे अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि राजू जाधव करत आहेत.