जळगावच्या युवाचार्य ग्रुपतर्फे साजरा झाला ८१ वा जन्मदिवस*
जळगाव,;– जळगाव येथील युवाचार्य ग्रुपतर्फे लाडके नेते, समाज चिंतामणी सुरेशदादा जैन यांचा २२ नोव्हेंबर रोजी ८१ वा जन्म दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. या औचित्याने सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक राजीव विजयवर्गीय (जयपूर) यांच्या भक्ती संगीत मैफिलीने जळगावच्या रसिकांचा उत्साह द्विगुणीत झाला. सेवादास दलुभाऊ जैन, ईश्वरलालजी जैन, अशोकभाऊ जैन, कस्तुरचंदजी बाफना, अनिल कोठारी, जितेंद्र काठारी आणि जळगाव येथील युवाचार्य ग्रुपचे अध्यक्ष मनीष लुंकड या मान्यावरांच्या प्रमुख उपस्थितीत व शेकडो जळगावकरांच्या साक्षीने भाग्यवर्धन पार्श्वनाथ मंदिर अर्थात दादावाडी, जळगाव येथे सायंकाळी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.
ज्यांचा जन्मदिवस साजरा झाला ते सत्कारमुर्ती सुरेशदादा जैन यांचे आगमन झाल्यावर युवाचार्य ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांनी ‘सुस्वागतम् सुस्वागतम् दादा का सुस्वागतम्’, ‘वेलकम वेलकम दादा का वेलकम’ अशा घोषणा केल्या. रोषणाईने सजलेल्या घोडागाडी बग्गीतून त्यांची मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. या प्रसंगी सेवादास दलुभाऊ जैन, ईश्वरबाबुजी, अशोक जैन आणि मनिष लुंकड, सौ. मंजू लुंकड यांच्याहस्ते सुरेशदादांचा सपत्नीक हृद्य सत्कार केला गेला. यावेळी वैशिष्ट्यपूर्ण असे मानपत्र देखील प्रदान करण्यात आले.
‘चलो बुलावा आया है दादा ने बुलाया है…’ या प्रसंगनिष्ठ स्वरचित गाण्याच्या सादरीकरणाने या भक्तीसंगीत मैफिलीचा आरंभ झाला. दादा गुरुदेव आणि सुरेशदादा जैन यांना समर्पित या भक्ती संध्येने अनेक गाण्यांवर श्रोत्यांनी ठेका धरला, उत्स्फूर्तपणे नृत्य ही केले. ‘मेरा दादा नाकोडावाला पारस नाथ रे..’, ‘मेरे मनमें पारस नाथ, मेरे रोम, रोम में पारसनाथ…’, ‘दादा गुरुदेव बोलोजी बोलो…’ अशा एकाहून एक अप्रतिम रचना सादर झाल्या. यावेळी श्रोत्यांनी त्यांच्या आवडीच्या गाण्याची फर्माईश देखील केली होती. यावेळी सुरेशदादांचा परिवार सौ. रत्नाभाभी जैन, राजेश, शैलेश, कन्या मिनाक्षी तसेच त्यांच्या भगिनी आणि दादांवर प्रेम करणारा मोठा गोतावळा यावेळी उपस्थित होता. या जन्मोत्सव कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्येकास कपाळावर टिळा लावून नंबर कुपन देऊन स्वागत करण्यात येत होते. नंबर कुपनचा लकी ड्रॉ सुरेशदादा व सौ. रत्नाभाभी जैन यांच्याहस्ते काढण्यात येऊन भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे प्रदान केले गेले. या आनंदमय उत्सावासाठी अतिथी बैठक व्यवस्था, भोजन, पिण्याचे पाणी व्यवस्था, स्वागत कमिटी, प्रसिद्धी, सोशल मीडिया, बॅच व्यवस्था तसेच लकी ड्रॉ इत्यादीसाठी युवाचार्य ग्रुपच्या सदस्यांवर जबाबदारी देण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्रजी लुंकड, ललीतभाई लोढाया, वसंतभाई शहा पदाधिकारींसह सदस्यांचे महत्त्वाचा सहभाग राहिला आहे.
जळगाव नगरीचे भाग्यविधाता करारी नेतृत्व, महान दातृत्व असलेले समाजचिंतामणी श्रीमान सुरेशदादा जैन यांचा २२ नोव्हेंबर २०२३ जन्मदिवस! या औचित्याने युवाचार्य ग्रुप जळगावच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात असतात. त्याचाच भाग म्हणून २२ नोव्हेंबर मोठ्या उत्साहात नियोजन केले आहे. त्याचाच भाग म्हणून सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक श्रीमान राजीव विजयवर्गीय यांची भक्ती संगीत संध्या आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगाव येथील सुप्रसिद्ध गायक रोहितजी लुंकड यांनी केले. यावेळी त्यांच्याही गाण्यांची अनुभूती देखील जळगावच्या श्रोत्यांना मिळाली.