१७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील सांगवी येथील विद्यार्थी वैभव बाळु पाटील (वय १७, रा. सांगवी) या विद्यार्थ्यांने १३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सारवे शिवारातील रशीद खाटीक यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

वैभव याने आत्महत्या का केली याबाबत अद्याप समजून आले नाही. तो पारोळा येथे शासकीय आयटीआयला शिकत होता. सकाळी त्याचे वडील सांगवीहुन सारवे फाट्यापर्यंत मोटरसायकलीने सोडण्यासाठी आले असता वडील माघारी सांगवी येथे गेले. त्यानंतर त्याने लगेच फाट्यालगतच्या सारवे शिवारात रशीद खाटीक यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.