पारोळा , लोकशाही न्युज नेटवर्क
पारोळा शहरातील बाजारपेठेतील म्हसोबा जवळील डीपीवर एका माकड मादीने त्याच्या पिल्लासह उडी मारल्याने त्यात दोघांना विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने त्यात माकड मादीचा मृत्यू झाला तर पिल्लू मात्र यातुन बचावला असून पिल्लू हे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले . यावेळी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी देशमुख यांनी त्याची तपासणी केली असता पिल्लू हे सुखरूप असल्याचे सांगितले.
माकड मादी ही मरण पावली आहे यावेळी माकड मादीचा मृत्यू झाल्याने तिच्यावर गावातील तरुणांनी अंत्ययात्रा काढून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील विविध भागांतील तरुण सरसावले होते. यावेळी डॉक्टर सोनवणे यांनी सदर मयत माकडाचे शवविच्छेदन करून सदर पिल्लूची जबाबदारी वन विभागाकडे सोपवली असून याबाबत वनपरीक्षक एस बी देसले यांनी वानराच्या पिल्लूच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतली असून वनपाल यांनी त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल असे सांगितले.