बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी अरेरावी !

0

जेवणाच्या वेळेस होतेय कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ ; ग्राहकांना नाहक मनस्ताप

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

कोणत्याही बॅँकेत सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो तसा अनुभावदेखील ग्राहकांना वारंवार येत असतो. मात्र जळगावातील  बँक ऑफ इंडियाच्या जळगाव येथील रेल्वेस्टेशनच्या शाखेत अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा उद्धटपणा आणि ग्राहकांशी केलेली वागणूक समोर आली आहे.

सर्वसामान्यांना आलेला अनुभव या बँकेत हा नेहमीच पाहायला मिळतो असे म्हटले जाते. दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी हे बॅँकेच्या शाखेत दुपारी दोन वाजेच्या सुमारास गेले असता असे निदर्शनास आले की, एका ज्येष्ठ नागरिकाला बँकेच्या एका कर्मचाऱ्याने केबिनच्या आतूनच जेवणाची वेळ असल्याने तुम्हाला थांबावे लागेल . असे सांगून ‘आम्ही जेवण करायचे कि, तुमचे काम करायचे ‘ असा उद्विग्न सवाल केला . आणि उधट पणे दरडावले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाला नाईलाजाने एका जागेवर बसून कर्मचाऱ्यांची जेवण होण्याची वाट पाहण्या व्यतिरिक्त गत्यंतर नसल्याने ते एका जागेवर आसनस्थ झाले.

त्यांना केवळ पासबुक भरायचे असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकशाहीच्या प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत संबंधित बँकेचे अधिकारी अमोल पाटील यांना विचारले असता त्यांनीही नियमावलीचा कित्ता गिरवून पाढा वाचला. तसेच २ ते ३ वाजेदरम्यान जेवणाची वेळ असल्याने या वेळेनंतर कामकाज होणार नसल्याचा खुलासा यावेळी केला. त्यांना आपण प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असून जेवणाच्या वेळेत सर्वच कर्मचारी एकाच वेळेस गेल्याने आता सध्या असलेल्या ३० ते ४० ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत असल्याचा जाब विचारल्यावरून बँक अधिकाऱयांचा पारा चढल्याचा प्रत्यय आला. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला बँक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीचा अनुभव येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना काय अनुभव येत असेल याचा विचारच न केलेला बरा. दरम्यान बँकेच्या नियमानुसार जेवणाच्या वेळेत जे कर्मचारी जेवणाला जात असतील त्या कर्मचाऱ्याच्या जागी पर्यायी (आळीपाळीने ) आपसात वेळ ठरवून कर्मचाऱ्यांनी जेवणाची सुटी घ्यावी असे बंधन कारक असताना बँकेचे काही लाईट बंद करून सर्व कामकाज आर्धा ते एक तास बंद करणे  अथवा कर्मचारी उपलब्ध न करणे हे ग्राहकांना वेठीस धरण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या ग्राहकांनी व्यक्त केल्या. जर सर्वच कर्मचारी एकावेळेस जेवायला बसल्यास आधीच बँकेच्या कामासाठी ताटकळत बसलेल्या ग्राहकांशिवाय नंतर बँकेत आलेल्यानाही यानंतर उशीर होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

दरम्यान अनेक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या पेन्शन योजनेसाठी ,शेतकरी व्यापारी मजूर वर्ग यात अनेक जण कमी शिक्षित अथवा अशिक्षित असल्याने त्यांना बँकेत येऊन आपले कोणतेही काम करावयाचे असल्यास त्यांना बँकेत यावेच लागते. त्यामुळे बँक कर्मचारी अधिकाऱ्यांची ग्राहकांशी असलेली वागणूक आणि उद्दामपणा हा चर्चेचा मुद्दा ठरला . यावर आता बँकेचे वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.