नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
संसदेचे हिवाळी अधिवेशन असून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी खासदारांना निलंबित करण्याचे सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. काल अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं, त्यावरून आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं, त्यानंतर आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे.
आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. तर, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आज ४१ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच आतापर्यंत १४१ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. १८ डिसेंबरपर्यंत एकूण ९२ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते.
आज या खासदारांचं निलंबन?
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, दानिश अली