लोकशाही न्यूज नेटवर्क
शिक्षप्राप्त कैद्यांना मिळणाऱ्या २१ दिवसांची संचित रजा संपल्यानंतर तांबापुरातील रहिवासी कैदी छत्रपती संभाजीनगर कारागृहात हजर न राहता फरार झाला आहे. गुप्त माहितीवरून रविवारी (दि. १७) रात्री साडेबारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानाशा वहाब शेख उर्फ गुड्डू (वय ३५, रा. तांबापुरा, जळगाव) असे फरार बंदीचे नाव आहे.
एका गंभीर गुन्ह्यात बंदी कानाशा वहाब शेख हा छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना कारागृह महानिरीक्षकांनी विनंतीवरून त्यास (२१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर) दरम्यान २१ दिवसांची संचित रजा मंजूर केली होती. रजेचा कालावधी उलटूनही न्यायालयीन बंदी गुड्डू हा मध्यवर्ती कारागृहात हजर झाला नाही. परिणामी कारागृहात शिपाई महेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून मध्यरात्री १२:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक नितीन पाटील करीत आहे.