उत्तर कोरियामध्ये फ्लश करणं गुन्हा, किम जोंगचं नवं फर्मान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर कोरियामध्ये टॉयलेट फ्लश करणं गुन्हा, किम जोंगचा नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचा विचत्र आदेश देण्यात आला आहे. यांचं कारण काय जाणून घ्या. उत्तर कोरियामध्ये टॉयलेट फ्लश करणं कायद्यानं गुन्हा आहे. हुकूमशाह किम जोंग उनने नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचा विचित्र दिला आहे. याच कारण काय जाणून घ्या. उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही राजवट आहे, त्यामुळे हुकुमशाहचा आदेश नागरिकांना पाळाला लागतो.

हुकूमशाह किम जोंग उन उत्तर कोरियातील जनतेवर विचित्र नियम लादत असतो. क्रूर किम जोंगने नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचा आदेश दिला. किम जोंग उनने टॉयलेट फ्लश करणं गुन्हा असल्याचं सांगत नागरिकांना मलमूत्र गोळा करण्याचे आदेश दिला होता. किम जोंग उनने फर्मान काढत फ्लश करण्यावर बंदी घातली आणि नागरिकांना विष्ठा गोळा करण्याचे आदेश दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांना सहा महिन्यांमध्ये १०० किलो मलमूत्र गोळा करण्याचा विचित्र आदेश देण्यात आला होता. त्यानंतर जास्त खतांचा तुटवडा निर्माण झाल्यावर २०० किलो मलमूत्र गोळा करण्याचा फ़तवाही त्याने काढला. इतकंच नाही जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्यावर दंड आकारण्यासही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येथील लोक फ्लश करायलाही घाबरू लागले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, कोरोनाकाळात किम जोंग उनने हा फतवा जारी केला होता. आता नागरिकांना किती मलमूत्र गोळा करावं लागत याबाबत कोणतीही माहिती नाही..उत्तर कोरियामध्ये किम जोंग उनची हुकूमशाही चालते, त्यामुळे तो नागरिकांना हवा तसा काही आदेश देत ते करण्यास भाग पाडतो आणि तसं न करणाऱ्या अगदी मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षाही देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.