भयंकर : पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, मुले मृतदेहाजवळ बसून..

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात कौटूंबिक वादातून धारदार शस्त्राने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. रेखाबाई दुरसिंग बारेला (44) या महिलेचा खून झाला असून संशयित पती दुरसिंग बारेला (47) यास चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगीराज पाटील यांच्या शेतात रेखाबाई बारेला यांची संशयित पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा कुठल्यातरी वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाला तर मुले आईच्या मृतदेहाजवळ बसून होती. मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांनी धाव घेतली.

चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी 24 तासात खुनाची उकल करीत आरोपीला अटक केली. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.