परिवर्तनचे दुर्गोत्सवानिमित्त स्त्री कलावंतांचे अभिवाचन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दुर्गोत्सवाच्या निमित्ताने लेखिका डॉ. उत्कर्षा बिर्जे यांच्या ‘इवल्या इवल्या गोष्टीं’चं मंजुषा भिडे दिग्दर्शित अभिवाचनाचा प्रयोग शनिवारी संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन जळगावच्या वतीने करण्यात आला. या अभिवाचनाची निर्मिती, अभिनय, तांत्रिक बाबी यात फक्त महिला कलावंतांचा समावेश होता. पूर्णतः महिलांच्या प्रश्नांवर महिलांनी अभिव्यक्त होणं ही खास नवरात्रीच्या निमित्ताने परिवर्तनने केलेली निर्मिती होती.

डॉ. उत्कर्षा बिर्जे यांच्या पुस्तकातील 6 गोष्टीच अभिवाचन

डॉ. अस्मिता गुरव, अंजली पाटील, शीतल पाटील, लीना लेले, पल्लवी सोनवणे, अवनी पंडित यांनी बहारदारपणे अभिवाचन केलं. आपल्या सादरीकरणातून रसिकांना एक उत्तम अनुभूती दिली. तांत्रिक मदत श्रद्धा कुलकर्णी, नेहा पवार यांनी केली. वेशभूषा नीलिमा जैन, रंगभूषा मोना निंबाळकर यांची होती.

दिग्दर्शिका मंजुषा भिडे यांनी या छोट्या छोट्या गोष्टी मधून एक सलग अनुभव सुंदर गुंफला होता. बायकांच्या जगातले प्रश्न हे वैश्विक आहेत. त्यांना स्पर्श करत, कधी खेळकर, कधी विनोद, कधी करुणेचा स्पर्श करत एक विचार करायला लावणारा अनुभव नवख्या अभिवाचकाकडून करून घेतला. सुप्रसिद्ध चित्रकार विकास मलारा यांच्या स्टुडिओत निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत हे अभिवाचन सादर करण्यात आले. संचलन हर्षदा कोल्हटकर यांनी केले तर आभार बिना मलारा यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.