ग्रामीण भागात कुरडया ,पापड करण्याची महीलांची लगबग

0

पापड आणि इतर वस्तुंना शहरात वाढती मागणी

धानोरा ता. चोपड़ा ,लोकशाही न्युज नेटवर्क

गेल्या अनेक दिवसापासुन खान्देशात ऊकाड्याने नागरीक हैराण होत असुन,कडक उन्हांचा तडाखा चांगलाच बसत आहे, याच उन्हांचा लाभ ग्रामीण भागात महिलां कुरडया, पापड, वड्या,शेवया करण्यासाठी घेत असतांना तयारीत दिसत असुन त्याची लगबग जोरात सुरु आहे.

सध्या ग्रामीण भागात जिकडे तिकडे घरगुती खाण्याचे कुरड्या, पापड करण्याचे काम प्रत्येक गावात सुरूआहे. प्रत्येक गावातील महिला आपल्या गल्ली तील महिला ऐकमेंकाना सहकार्य करुण उडीदाच्या दाळीचे पापड, बिबड्या, चिकनी चे पापड, गव्हाच्या शेवया, नागलीचे पापड , तांदुळ गव्हाचे पापड आदी सामान करताना दिसत आहेत. हा सामान एक वर्षाचा असतो. आणी ह्या वस्तु करतांना फार काळजी घ्यावी लागते. कुरड्या, पापड मार्केटलाही मिळतात,मात्र त्याचा पाहीजे तसा स्वाद लागत नाही.

त्यामुळे आजही ग्रामीण भागातील ह्या सामानाची चवही एक वेगळ्या प्रकारची स्वाद पुर्णं असते. आपल्या ग्रामीण भागातल्या विविध प्रकारचे पापड , शेवया यांना शहारात मोठी मागणी कायम असुन महिलांबचत गट घरच्या घरी ह्या सर्व वस्तु मध्ये सर्वसामान माफशीर टाकून स्वादिष्ट बनवून शहरात विक्रीसाठी देखील पाठवतात . त्यात त्यांना चांगले पैसे देखील राहतात, प्रत्येक सणाला गोडधोंड करुण खाण्याची आपली पध्दत असल्याने वर्षभरपुरेल इतका सामान महिलांमंडळ या दिवसामध्ये एकमेंकाच्या सहकार्याने बनवत असतात ही कामे करिता असतांना वृध्द महिलांचा सल्ला घेतात, तसेच विविध आहीराणी ,गाणे देखील म्हणतात, हाच सामान लग्नात नवरदेवाला पारावर देण्यात सुध्दा वापरतात. तर बाहेरगावी पुणे, मंबुई, सुरत या ठिकाणी आपल्या नातेवाईकाकडे पाठवत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.