पाचोरा शेतकरी सहकारी संघात हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

0

पाचोरा ,लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा येथील शेतकरी सहकारी संघात हरभरा खरेदी केंद्राचे शुभारंभ (हंगाम) २०२२ / २०२३ खरेदी केंद्र साध्या पद्धतीने शेतकरी बांधवाच्या हस्ते करण्यात आले आहे.

पाचोरा शेतकरी सहकारी संघाच्या आवारात २७ रोजी सकाळी १० वाजता पाचोरा – भडगाव संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तर प्रथम शेतकरी यांना माजी आमदार दिलीप वाघ यांनी पुष्पहार, श्रीफळ व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनील पाटील व संचालक प्रकाश निकुंभ, रामधन पाटील यांचेसह शेतकरी उपस्थित होते. प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनील विठ्ठल पाटील यांनी सांगितले की, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.