निजामपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
वार्ड क्रमांक 1 येथील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता वॉर्ड मधील सर्व महिलांनी ग्राम पालिकेत आज मोर्चा काढण्यात आला होता. सरपंच प्रतिनिधी भुषण वाणी यांना नागरीकांनी घेराव करून पाणी टंचाई बाबत जाब विचारला. दिवसेन दिवस पाणी टंचाई समस्या वाढत असून मुस्लीम वस्तीत ऐन सणाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. टँकरने सुध्दा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. उन्हाळयात पाणी पुरवठा विस्कळित झाल्याने लोकांना पाणी मिळत नाही. गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामामुळे मुख्य जलवाहिन्या उखडल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. संतप्त झालेल्या नागरीकांनी ग्रामपालीकेत मोर्चा काढत, लवकर पाणी प्रश्न मिटवावा नाहीतर ग्राम पालिकेला कुलूप लावू अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. गावातील नादुरूस्त बोरवेल सूरळीत करावे, वार्डतील गटारीच काम मार्गी लावावे. अश्या अनेक समस्या नागरीकांनी मांडल्या.