विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; आजपासून 24 तास दर्शन

0

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. 23 नोव्हेंबरला  रोजी कार्तिकी एकादशी असून या निमित्त लाखो भाविक पंढरपूरला येतात. याच पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले  राहणार असल्याने रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे.

आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास देवाच्या पोशाख आणि शेजारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात येतो. 1 डिसेंबर पासून विठ्ठलाची प्रत्यक्ष पूजा होणार असून त्या दिवसांपासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू होणार. अशी प्रथा सांगितली जाते की, देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते. यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.