जामनेर, भडगाव,भुसावळ येथून तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळविले

0

जळगाव;-जिल्ह्यातील जामनेर ,भडगाव ,भुसावळ या वेगवेगळ्या ठिकाणावरून 16 वर्षीय अल्पवयीन तीन मुलींना फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी त्या त्या पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावातून १५ वर्षे पाच महिन्याच्या अल्पवयीन मुलीला २ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद जामनेर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.

दुसऱ्या घटनेत भडगाव तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने 29 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते 30 नोव्हेंबर रोजीच्या पहाटे चार वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आजोबांनी दिल्यावरून भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे

. तिसऱ्या घटनेत भुसावळ शहरातील लाल जैन मंदिराजवळून एका १६ वर्षीय मुलीला ३ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आजीने दिल्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.