तेलंगणामध्ये मोठी दुर्घटना, एअर फोर्सचे विमान कोसळून २ जण ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तेलंगणामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळल्याची बातमी समोर येत आहे. मेडक जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन भारतीय वायुदलाच्या वैमानिकांच्या मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक प्रशिक्षक व एका कॅडेटचा समावेश आहे.

तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले आहे. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (४, डिसेंबर) सकाळी ८.५५ वाजता हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे. दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, यामध्ये कोणत्याही नागरिकांची जीवितहानी झालेली नाही. एअरफोर्स अकादमीत प्रशिक्षणादरम्यान दिंडीगुलमध्ये हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील मेडक जिल्ह्यात हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा विमान तूप्रन भागात होते. एअरफोर्स अकादमी डुंडीगल येथून विमानाने उड्डाण केले होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला शोक
या दुर्घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दुःख व्यक्त केले आहे. ” हैदराबादजवळ झालेल्या या अपघातामुळे दुःख झाले. यात दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागलाया दु:खद प्रसंगी मृत वैमानिकांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत, असे ते म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.