जळगावतील बिग बाजार येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळाविले

0

जळगाव ;– येथील रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या बिग बाजार येथून एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एका विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाच्या १५ वर्षीय मुलीला 30 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लक्ष्मण बंडू सपकाळे वय 18 याने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिल्यावरून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.