उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी दांड्याने बदडले

0

जळगाव ;- उधार दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने करून दुखापत केल्याची घटना रामेश्वर कॉलनीतील आदित्य हॉटेल चौकात 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सागर सुरेश कोळी वय 32 हा मिस्तरी काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याने संशयित योगेश उर्फ कर्कटक भागवत जाधव राहणार रामेश्वर कॉलनी याला उधार दिलेले पैसे मागितले असता योगेश उर्फ कर्कटक याला याचा राग आल्याने त्याने सागर कोळी याला त्याचा मित्र योगेश (पूर्ण नाव गाव पत्ता माहित नाही )अशा दोघांनी मिळून 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास लाकडी दांड्याने डाव्या हातावर व पायावर मारून दुखापत केल्याचा प्रकार घडला.

याबाबत सागर कोळी याने एक डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.