अमळनेर;- तालुक्यातील सारबेटे येथून आज्ञा चोरट्यांनी 24 हजार रुपये किमतीचे तीन गुरे 29 नोव्हेंबर च्या रात्री ते 30 नोव्हेंबर च्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरून नेलाचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सार बेटे येथील रहिवासी असलेले विशाल ब्रम्हे वय 48 हे शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांच्या घरासमोर अंगणात 24 हजार रुपये किमतीचे गुरे बांधलेले असताना 29 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याचा प्रकार उघडकीस आल्याने विशाल ब्रम्हे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.