पालकमंत्र्यांच्या गावात बत्ती गुल : ट्रान्सफार्मर नादुरुस्त

पाळधीसह परिसरातील गावे मध्यरात्री पासून अंधारात

0

 

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

विज वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर मध्यरात्री अचानक नादुरुस्त झाल्याने पाळधीसह परिसरातील गावे मध्यरात्री पासून अंधारात असून नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत. पाळधी येथे विज वितरण कंपनीचे कार्यालय असून येथूनच परिसरातील गावांना तीन विद्युत ट्रान्सफार्मर द्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो. यातील एक ट्रान्सफॉर्मर मध्यरात्री अचानक नादुरुस्त झाल्याने पाळधी सह परिसरातील गावांतील विद्युत पुरवठा ठप्प झाला. अचानक विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने कर्मचारी यांची धांदल उडाली.

विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने काल दिवसभर येथिल सर्व व्यवहार ठप्प झाले होते. विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने बँक, पोस्ट आदींचे व्यवहार ठप्प झाले होते. आधीच बँका दोन दिवस बंद होत्या, त्यात हा प्रकार घडल्याने तेथील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

यातच सर्व सामान्य नागरीकांना दळण, पाणी आदींचा समस्यांना सामोरे जावे लागले. तर दूध व्यावसायिक तसेच ऑन लाईन चालणारे सर्व व्यवसाय यांनाही याचा फटका बसला. या बाबत येथील उप अभियंता लोकेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे चोपडा येथून नवीन ट्रान्सफॉर्मर मिळाले असून ते बसविण्याचे काम सुरू आहे.

आता रात्री पाळधी व परिसरातील गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असून आज दुपार पर्यंत हा विद्युत पुरवठा सुरळीत होईल. जळगांव येथील अधिकारी येवून त्यांनीही प्रयत्न केले, मात्र विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. हे सर्व ट्रान्सफॉर्मर जुने झाले आहेत. या आधीही २०१७ मध्ये अशीच समस्या निर्माण झाली होती असे नागरीक बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.