पाकिस्तानचा “वजीर-ए-आजम” कोण ? नवाज की इम्रान ?

0

 

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, माजी पंतप्रधान इम्रान खान तसेच परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो या तिन्ही नेत्यांनी संसदीय निवडणुकीत आपापल्या पक्षांना सहज विजयाची आशा व्यक्त केली होती. मात्र आता प्रत्येक पक्षाची सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठीची आव्हानात्मक वाटचाल सुरू आहे. सत्तेच्या समीकरणात अपक्ष उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यांच्या सहकार्यानेच पाकिस्तानमध्ये पुढचे सरकार स्थापन होणार असल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानची न्यूज एजन्सी जिओ न्यूजनुसार, संसदेच्या 241 जागांच्या निकालात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थित उमेदवारांना 96 जागा मिळाल्या आहेत तर नवाझ शरीफ यांचा पक्ष – पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) दुसऱ्या स्थानावर आहे. पीएमएल (एन) चे 69 उमेदवार विजयी झाले आहेत तर बेनझीर भुट्टो यांचा वारसा असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) 52 जागा जिंकल्या आहेत. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटच्या उमेदवारांनी 15 जागा जिंकल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.