ऑपरेशन लोटस पासून आमदारांना दूर ठेवण्यासाठी लालू यादवांनी लढवली अनोखी शक्कल…

0

 

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

बिहारच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आरजेडीच्या सर्व आमदारांना तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी थांबवले आहे. आमदारांच्या कपडे घरून मागवले आहेत. एका आमदाराच्या कर्मचाऱ्याने तर गिटार देखील आणली आहे.

फ्लोअर टेस्ट कधी होणार?

बिहारमध्ये १२ फेब्रुवारीला फ्लोर टेस्ट होणार आहे. जेडीयूने 11 फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यात जेडीयूच्या सर्व आमदारांनी सक्तीने सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले आहे. बिहार काँग्रेसचे आमदार हैदराबादला पोहोचले आहेत. आमदार फुटण्याच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जीतनराम मांझीही चर्चेत

फ्लोअर टेस्टपूर्वी बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिंदुस्थान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणखी एक मंत्रीपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. फ्लोर टेस्टपूर्वी तो कोणती पावले उचलतो हे पाहणे बाकी आहे. मात्र, त्यांना मिळालेल्या मंत्रिपदावर समाधानी असल्याचे त्यांचे पुत्र आणि मंत्री संतोष सुमन यांनी म्हटले आहे.

 

कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत?

विधानसभेच्या जागा: 243

RJD : ७९ आमदार

काँग्रेस : १९ आमदार

CPI(M-L)+CPI+CPI(M): 16 आमदार

विरोधकांकडे एकूण संख्याबळ : ११४ आमदार

AIMIM : १

Leave A Reply

Your email address will not be published.