हॉटेलमध्ये पैसे मागितल्यावरून तरुणावर वार

0

भुसावळ :तरुणावर  हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून चाकूहल्ला करण्यात आला, तर दोघांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना  १ रोजी रात्री सव्वाबारा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश रघुनाथ तपकिरे (अयोध्यानगर, शांतीनिकेतन जवळ, जळगाव) याच्या तक्रारीनुसार, शहरातील उंट मोहल्ला भागातील हॉटेल रुचीमध्ये दोघे संशयित जेवणासाठी आल्यानंतर त्यांना जेवण झाल्यानंतर बिल मागितल्याचा राग आला. या रागाताच यश यास एकाने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली, तर दुसऱ्याने यश व महेश जाधव तसेच जसवंतसिंग राजपूत यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी देत सोबत आणलेल्या चाकूने जसवंत सिंग यांच्या उजव्या डोळ्यावर वार केला. या हल्ल्यात जसवंत सिंग यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, तसेच डाव्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली. तपास सहायक निरीक्षक हरीश भोये करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.