विखरण येथील पोलीस हल्ला प्रकरणी १२ जणांना अटक

0

एरंडोल : १ जानेवारीला पोलीस वाहनावर  तालुक्यातील विखरण येथे ग्रामपंचायत कार्यालय चौकात झालेला हल्ला व मारहाण प्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात ३९ जणांवर गुन्हा दाखल असून त्यापैकी १२ संशयितांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. तर उर्वरित २७ संशयित फरार आहेत.

या प्रकरणात सागर उर्फ पवन रावा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विखरण येथील संशयित गोविंदा जुलाल पवार, एकनाथ वेडू भील, गोकुळ साहेबराव भील, जितेंद्र रामू मालचे, जितेंद्र सुखदेव भील, रतन गुलाब भील, राजू भील, रवींद्र नामदेव पवार, शंकर रामसिंग पवार, मधुकर वेडू पवार, गणेश नाना सोनवणे, राजेंद्र रोहिदास ठाकरे, अनिल भगवान ठाकरे, भूषण किसन पवार, गोलू किसन पवार, कमलेश धोंडू इंगळे, वसंत ताना मोरे तसेच इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात नाना बाबुराव बागडे हे फिर्यादी असून या प्रकरणी संशयित सागर चौधरी, तुका महाजन, समाधान माळी, भूषण महाजन, कैलास महाजन, योगेश महाजन, लोटन चौधरी व अनोळखी ३ ते ४ जणांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान, कांद्याच्या गोण्या उचलण्याच्या कारणावरून ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास विखरणच्या संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांड्याने बागडे व किसन पवार, संगीता पवार, वैशाली ठाकरे, हिंमत पवार यांना मारहाण करण्यात आली होती. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३० ते ३५संशयितांवर गुन्हे दाखल आहे. या प्रकरणी रवींद्र पवार, शंकर पवार, कमलेश इंगळे, वसंत मोरे, गणेश सोनवणे (रा. विखरण) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.