पहूर आठवडे बाजारात हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पहूर येथे रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यात ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रविवारच्या आठवडे बाजारात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरोपी शाकेराबी हिने तीची बोंबिलची पोतडी साक्षीदार शामराव भोई यांच्या दुकानाच्या पैशाच्या गल्ल्यावर ठेवली.  ती पोतडी बाजूला करण्यासाठी सांगीतल्याच्या कारणावरून हाणामारी झाली.  यावेळी  फिर्यादीला व  नातेवाईकांना बांबूच्या काठ्यांनी तोंडावर, डोक्यावर  तसेच पाठीवर मारहाण करून गंभीर दुखापत करून  शिवीगाळ व दमदाटी केली.

याप्रकरणी  शोभा अशोक भोई (वय ५४, रा . पहूर पेठ) यांच्या फिर्यादीवरून  गफ्फार लतीफ, फकीरा लतीफ, इमरान काल्या, मोशा बुढण, बबल्या फकीरा,  बबल्याचा मुलगा, रोशन, शहारूख, समिर, साहील, साकेराबी, सुफीयाबी, साकेराबी हीची मुलगी रा. पहूर पेठ यांच्या विरुद्ध गु. र. नं. २ / २०२४ भादवी कलम १४३/ १४७ / १४८ / १४९ / ३२३ / ५0४ / ५०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याप्रकरणी  इमरान शेख अब्दल रा . पहूर पेठ यांच्या फिर्यादीवरून संजय भोई, अशोक भोई , अशोक भोईचा मुलगा, हरीष भोई, शामराव भोई, शोभा बाई भोई व नातेवाईक यांच्या विरुद्ध  गुरन 3 / २०२४ भादवी कलम १४३ / १४७ / १४८ / १४९ / ३२३ / ५०४ / ५०६ प्रमाणे नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन केले.  पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील व सहकारी करत आहेत.  दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.