विवाहितेचा विनयभंग; एका विरुद्ध गुन्हा दाखल…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील शेवाळे येथील एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा शहरातील भारत डेअरी स्टाॅपवर एका इसमाने हात पकडून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत सदर शेवाळे ता. पाचोरा येथील इसमाविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील शेवाळे ता. पाचोरा येथील महिला पाचोरा शहरात खाजगी नौकरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत आहे. १५ मे रोजी पिडीत महिला ही सायंकाळी घरी जात असतांना शहरातील भारत डेअरी स्टाॅपवर रामेश्वर पाटील (पुर्ण नाव माहित नाही) रा. वाडी ता. पाचोरा हा इसम महिले जवळ येऊन महिलेचा हात पकडत तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रामेश्वर पाटील यांचे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भगवान बडगुजर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.