पाऊस पाण्याची खबरबात; मान्सून कधी दाखल होणार राज्यात…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

या महिन्याच्या सुरुवातीला अवकाळीचा मारा झेलणाऱ्या प्रत्येकाला आता तापमानाच्या वाढलेल्या पाऱ्याने हैराण करून सोडले आहे. अशातच राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी येत आहे. यंदा मान्सून हा उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. एरवी केरळमध्ये १ जूनला येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी येण्याची शक्यता आहे. ४ जून रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर पुढील २ दिवसांत म्हणजेच ६ जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होईल, असा पूर्व अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

मान्सूनच्या आगमनाची चाहुल लागताच सर्वसामान्यांसह शेतकरी राजा सुखावून जातो. आभाळाकडे डोळे लावून बसतो. मात्र, यंदा हाच मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असून, ६ जून रोजी महाराष्ट्रात हजेरी लावेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.