पाचोऱ्यातील २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू..

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शहरातील देशमुखवाडी येथे २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथील रहिवाशी निखिल चंद्रकांत पाटील (२५) हे दुपारच्या सुमारास लघुशंकेसाठी जात असताना त्याला सर्पाने दंश केला. दरम्यान निखिल यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी निखिल यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे. निखिल याचे पाश्चात्य आई, वडील, एक भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. निखिल याचे अकस्मात मृत्यूने देशमुखवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.