डॉक्टरांच्या हलगर्जीने १५ दिवसाचे बाळ दगावले

बाळाच्या प्रेताची विटंबना: नातेवाईकांचा आरोप

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

शहरातील वृंदावन हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या १५ दिवसाचे बाळ रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावल्याचा गंभीर आरोप पिडीत आई, वडिल व एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांनी पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत केला. संबंधित डॉक्टरांवर व रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, पिडित आई वडील उपस्थित होते.

वडधे ता. भडगाव जि. जळगाव येथील अनिता अनिल मालचे या नासिक येथे प्रसुती झाल्या. १५ दिवसानंतर ते त्यांच्या गावी आले. १४ नोव्हेंबर रोजी बाळाची प्रकृती बरी नसल्याने उपचारासाठी पाचोरा येथील योजनेतील हॉस्पीटल असल्याकारणाने वृंदावन हॉस्पीटल पाचोरा येथे दाखल केले. यावेळी बाळाची प्रकृती चिंताजनक नव्हती. डॉक्टरांनी बाळाला उपाचारासाठी दाखल करून काचेच्या पेटीत ठेवण्याचे सांगत आई वडिलांच्या सह्या व अंगठे घेतले व उपचारास सुरुवात करून औषधी आणण्याचे सांगितले. औषधी घेऊन आल्यानंतर आईला सांगण्यात आले की, बाळाला जळगाव सरकारी दवाखान्यात घेऊन जा असे संगितले असता पीडित पालकांकडे जळगाव जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे मग तुम्ही पाचोरा येथे सरकारी दवाखान्यात जा तेथून तुम्हाला १०८ नंबरची रुग्णवाहिका मोफत मिळेल आम्ही आता तुम्हाला बाळाला घेऊन जाण्यासाठी खासगी रुग्णावाहिका सांगितली आहे. तोपर्यंत तुम्ही बाळाला घेऊन दवाखान्याच्या बाहेर बसा असे संगितले. व बाळाला घेऊन आम्ही रुग्णालयाच्या पायऱ्यांवर साधारण २० मिनीटे बसून राहिलो. रुग्णवाहिका दवाखान्याजवळ आल्यावर आम्ही त्यात बसलो असता मृत्यू पावलेल्या बाळाला पाचोरा रुग्णवाहिकेत ऑक्सीजन लावून ग्रामीण रुग्णालयात आले. तेथे असलेल्या महिला डॉक्टरने बाळाला तपासले असता त्यांचे बाळ मरण पावले असल्याचे सांगण्यात आले.

वृंदावन हॉस्पिटल येथील डॉक्टर व कर्मचारी वर्गाने मृत्यू पावलेल्या बाळाची अवहेलना करून विटंबना झाली तसेच वरील संबंधित हॉस्पिटलचे बेजबाबदार डॉक्टर व कर्मचारी यांनी बाळाला कोणताही डीचार्ज अथवा दुसऱ्या हाॅस्पिटलला (रेफर) कोणत्याही प्रकारचे डीचार्ज कार्ड दिले नाही.  तसेच बाळाला काचेच्या पेटीत उपचार चालू असताना त्या बाळाला ऑक्सीजनची गरज असताना डायरेक्ट बाळाला काचेच्या पेटीतुन काढुन आईच्या कुशीत बळजबरी देऊन दुसरी रुग्णवाहिका आल्यावर येथून घेऊन जा. जवळपास २० ते २५ मिनिटे दुसरी रुग्णवाहिका आल्यावर पाचोरा सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले.

तसेच पीडित कुटुंब हे गरीब आदिवासी अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यावर व मृत्यू पावलेलेल्या बाळाची विटंबना करून आदिवासी समाजाच्या अस्मिता व भावना दुखावल्या असे निंदनीय कृत्य हेतु पुरस्कर वृंदावन हॉस्पिटल येथील डॉक्टर व कर्मचारी यांच्याकडून झाल्याने त्यांच्यावर वैद्यकीय कायद्यांतर्गत हॉस्पिटल संचालकांवर तसेच त्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही शासकीय योजना सुरू असतील त्या बंद करून वरील घटनेला जबाबदार धरून हॉस्पिटलचा परवाना रद्द करून संचालकांवर व बेजाबदार डॉक्टर व कर्मचारी यांचावर अनुसूचीत जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ व पिडित आई वडिलांकडून करण्यात आली आहे.

आज धरणे आंदोलन

१४ नोव्हेंबर पासून पीडित कुटुंबाने पाचोरा पोलिस स्टेशनला लेखी स्वरुपात तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत संबंधित लोकांवर कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे आज १७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी एकलव्य संघटनेच्या वतीने पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

आयजी पाचोरा पोलिस स्टेशनच्या निरिक्षण दौऱ्यावर

वार्षिक निरिक्षणासाठी आयजी आज १७ नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये येत आहेत. वडधे ता. भडगाव येथील गरीब कुटुंबातील १५ दिवसाच्या बालकाचा शहरातील वृंदावन हाॅस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला व बाळाच्या प्रेताची विटंबना झाली. यामुळे एकलव्य संघटना आक्रमक झाली असुन पिडित आई वडील यांच्यासह पोलिस स्टेशनसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रकरणी आय. जी. काय कार्यवाही करतात ? याविषयी परिसरात चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.