डी.वाय.एस.पी. यांच्या सतर्कतेने वाचले तिघांचे प्राण

0

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क:

 

पाचोरा विभागाचे डी.वाय.एस.पी. धनंजय येरुळे हे २७ जून रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव येथुन पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांना नांद्रा ते हडसन दरम्यान मोटरसायकल अपघातात महिला, एक तरुण व चिमुकले बाळ हे रस्त्यावर पडलेले दिसले. दरम्यान त्यांच्या ही परिस्थिती निदर्शनास येताच त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर जखमींना तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिघ जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

पाचोरा विभागाचे डी. वाय. एस. पी. धनंजय येरुळे, पोलिस काॅन्स्टेबल अजितसिंग राजपुत, चालक पंकज मोरे हे २७ जुन रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास जळगावहुन पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांना नांद्रा ते हडसन दरम्यान दिनेश रामदास वाके, आशाबाई रामदास वाके व एक चिमुकले बाळ रा. दुसखेडा ता. पाचोरा हे दुसखेडा येथे जात असतांना यांच्या मोटरसायकल समोर अचानक नीलगाय आडवी आल्याने मोटरसायकलचा अपघात होवुन तिघ जण जखमी झाले होते. सदरचा प्रकार डी.वाय.एस.पी. धनंजय येरुळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांना घटनेची माहिती देत जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. राहुल बेहरे यांनी डाॅक्टरांना तातडीने पाचारण करत उपचार सुरू झाल्याने डी.वाय.एस.पी. धनंजय येरुळे, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांच्या सतर्कतेने तिचं जखमींचे प्राण वाचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.