दुचाकीचा कट लागल्याने तरूणाची हत्या; ५ जणांना अटक

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाचोरा शहरात युवकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. दि ३० रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुर्‍हानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात तरुणांच्या झालेल्या वादात एका २३ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता त्यास पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले. उपचारा दरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला.  या घटनेत भूषण नाना शेवरे (वय २३, रा. दुर्गा नगर, पाचोरा) याचा मृत्यू झाला.

दि. ३० रोजी पाचोरा येथे भडगाव रोडवरील साई मंदिरा जवळ या घटनेतील भूषण नाना शेवरे (वय २३, रा. दुर्गा नगर, पाचोरा) याचे व संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी (वय २२) ( पूर्ण नाव माहीत नाही) याचे वाहनाचा कट लागल्यावरुन वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संशयित आरोपीने भुषण नाना शेवरे यास पुनगाव रोडवरील बुर्‍हानी इंग्लिश मिडियम स्कूल परिसरात साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान फोन करून बोलवले होते. संशयित आरोपी सोबत यावेळी दहा ते बारा अज्ञात तरुण असल्याची देखील माहिती मिळाली.

तरूणाची हत्या करणार्‍या टोळक्यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील आणि पवन पाटील (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुरनं ४२/२०२२ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील आणि अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी तीन फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.