या निवडणुकीत कॉंग्रेसची स्वबळावरची तयारी

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: 

 

शेतकर्‍यांची कष्टाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाली असुन पाचोरा-भडगाव तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची स्वबळाची तयारी सुरू झाली असुन, पाचोरा-भडगाव तालुक्यातील कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृहात तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाचोरा-भडगाव तालुक्यातील काही इच्छुक उमेदवारांची चर्चा झाली यात बाजार समितीला भविष्यात विक्री करण्याचा काहींचा डाव असल्याने ही बाजार समिती वाचविणे गरजेचे आहे. यासाठी समविचारी पक्ष सोबत आले तरी चालेल, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी वर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, भडगाव तालुकाध्यक्ष रतीलाल महाजन, युवक अध्यक्ष प्रदीप पाटील, भडगाव अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष कमर अली, सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी सेल तालुका इरफान मनियार, प्रशासन सरचिटणीस शिवराम पाटील, एसी सेल तालुकाध्यक्ष श्रावण गायकवाड, महीला जिल्हा सरचिटणीस कुसुम पाटील, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, जिल्हा सदस्या अॅड मनिषा पवार, क्रांती पाटील, रेखा पाटील, तालुका खजिनदार सुनील पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष अमजद मौलाना आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.