धक्कादायक; अन, अचानक पायाखालची जमीनच खचली…

0

 

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: 

 

पंढरपूर शहरात एक अचंबित करणारी घटना घडली आहे. शहरात असलेल्या कोळी गल्लीतील घराखालची जमीन अचानक खचली. या गटनेत घर देखील खचले असून यामध्ये तीन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

पंढरपूर शहरातील केाळी गल्‍लीतील राजू शिंदे यांचे घरातील एका खोलीतील जमीन वीस ते पंचवीस फूट खोल खचली. यामुळे येथे मोठा खड्डा पडला आहे. यावेळी घरात असलेल्‍या महिला देखील या खड्डयामध्ये पडल्‍याने तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले‌ आहे.

मोठा आवाज झाल्‍याने आजूबाजूला असलेल्‍या नागरीकांनी घराकडे धाव घेतली. तसेच या घटनेनंतर पोलीस व नगरपालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. यानंतर खड्ड्यात पडलेल्‍या तीनही महिलांना नागरीकांच्‍या मदतीने बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.