एकनाथ शिंदे नाही तर, डॉ. एकनाथ शिंदे… या विद्यापीठाने केली डॉक्टरेट बहाल…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:     

 

डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज डी.लिट ही पदवीने गौरव करण्यात आला आहे.

मी आधीच छोटी मोठी ॲापरेशन केली असल्याने मी आधीच डॅाक्टर झालो होतो, अशी मिश्किल टिप्पणी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ही पदवी मी महाराष्ट्रामधील लोकांना अर्पण करत आहे. जे संघर्ष करून पुढे जात आहेत त्यांना अर्पण करत आहे.

कधी विचार केला नव्हता पण बरंच काही मिळत गेलं. डॉक्टरेट पदवी मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. डी. लिट पदवी दिल्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

डी वाय पाटील विद्यापीठाने अनेक थोर विचारवंत, खेळाडू यांना डी लीट पदवी दिली आहे. आज या यादीत माझे नाव आले आहे. माझ्या मुलाचे वैद्यकीय शिक्षण याच कॅालेजमधून झाले असून मलाही याच विद्यापीठाने डी लीट पदवी दिल्याने मला विशेष समाधान आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

राज्यातील जनतेने मला भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळेच मी आज इथे आहे. डी वाय पाटील यांनी शिक्षणाला एका साच्यातून बाहेर आणले. त्यांनी शिक्षणात मोठं काम केलं आहे. नवी मुंबईत काहीच नसताना येथे डी वाय पाटील विद्यापीठ सुरू केले. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.