धावत्या रेल्वेसमोर आल्याने ३२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा रेल्वेस्थानका नजीक धावत्या रेल्वेसमोर आल्याने शहरातील एका ३२ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ जुन रोजी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात पोलिस हेड काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळा पंचनामा करत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

शहरातील हनुमान नगर भागातील रहिवासी नितीन सुरेश नन्नवरे (वय – ३२) रा. हनुमान नगर, बस स्टॅण्ड रोड, पाचोरा हे २५ जुन रोजी ११ वाजेच्या सुमारास रेल्वे लाईन क्रास करत असतांनाच कोणत्यातरी धावत्या रेल्वेसमोर सापडुन नितीन सुरेश नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार हे जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.